
आरोग्य तज्ज्ञांच्या मते बदाम रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी सोलून त्याचे सेवन करा. यामुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतो.

सकाळच्या जेवणामध्ये किमान एक तरी पालेभाजी असली पाहीजे. विशेष: आपल्या दिवसभराच्या आहारामध्ये एकदा तरी पालक खा.

शरीरात व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात ठेवण्यासाठी आपण एवोकॅडो खाणे आवश्यक आहे. एवोकॅडो हा नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे.

सूर्यफुलाच्या बिया देखील आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई चांगल्या प्रमाणात असते.

शेंगदाण्यामध्ये व्हिटॅमिन ई आणि इतर अनेक पोषक घटक असतात. यामुळे आपल्या दररोजच्या आहारामध्ये शेंगदाण्यांा नक्की समावेश करा.