
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, तूप खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र, असे म्हणतात की, तूप खूप खाल्ल्याने रूप येते. तसेच तुपाच्या मदतीने आपण त्वचेच्या अनेक समस्या दूर करू शकतो.

बऱ्याच लोकांना या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये कोरड्या त्वचेची समस्या निर्माण होते. मग अशावेळी आपण आपल्या त्वचेला रात्री झोपताना तूप लावायला हवे.

काही लोकांची त्वचा इतकी जास्त कोरडी असते की, अनेक उपचार करूनही कोरड्या त्वचेची समस्या काही दूर होत नाही. मग अशावेळी आपण तूपामध्ये खोबरेल तेल मिक्स करून चेहऱ्याला लावावे.

तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी तूपामध्ये मध मिक्स करून चेहऱ्याला लावा. मात्र, तूप आणि मध शक्यतो रात्रीच्या वेळीच लावा. यामुळे आपली त्वचा तजेलदार होण्यास मदत होते.

चेहऱ्यावरील पुरळ आणि बारीक रेषांची समस्या दूर करण्यासाठी आपण तुपामध्ये गुलाब पाणी मिक्स करून दररोज राऊी चेहऱ्याला लावावे. यामुळे त्वचेच्या सर्व समस्या दूर होतात. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)