
हिवाळा, उन्हाळा, पावसाळा कोणताही हंगाम असो...काही लोक आपल्या शरीराकडे लक्ष देत व्यायाम बाराही महिने करतात. पण उन्हाळ्यात तापमान वाढले की अतिरिक्त व्यायाम करावा लागतो. त्यामुळे यादरम्यान आपण काही टिप्स नक्कीच फाॅलो करणे खूप जास्त महत्वाचे आहे.

बऱ्याच लोकांना दुपारच्या वेळी व्यायाम करण्याची सवय असते. मात्र, हे हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये ठिक आहे. मात्र, या सध्याच्या हंगामामध्ये दुपारी व्यायाम करणे टाळा.

योगासने घरामध्ये करा. व्यायाम करताना नेहमी पाण्याची बाटली आणि टॉवेल जवळ ठेवा. उष्ण हवामानात शरीराला जास्त घाम येतो. व्यायाम करताना तेच वाढते. शरीर नेहमी हायड्रेटेड ठेवा.

शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी व्यायाम करताना पाणी प्या. याशिवाय व्यायामानंतर फळांचा रस, स्मूदी इत्यादी खाऊ शकता. मीठ, साखर आणि लिंबू मिसळलेले पाणी पिणे देखील चांगले आहे.

व्यायाम झाल्यावर लगेचच अंघोळ करा. कारण या हंगामामध्ये घाम येण्याचे प्रमाण अधिक असते. हा घाम आपल्या अंगावर जास्त काळ राहिला तर पुरळ येण्याची समस्या निर्माण होते.