
वाढत्या वयानुसार आपल्या शरीरात अनेक बदल होतात. वयाच्या 30 वर्षानंतर शरीराची विशेष काळजी घ्यावी लागते. विशेष: आपल्या आहाराची काळजी 30 शीनंतर घ्या आणि आपल्या आहारामध्ये जास्तीत-जास्त भाज्यांचा समावेश करा.

चवळी हा पोटॅशियमचा चांगला स्रोत मानला जातो. त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम इत्यादी अनेक पोषक घटक देखील आढळतात. हे पचायलाही खूप सोपे आहे. चवळी त्वचा आणि केसांच्या काळजीसाठी देखील फायदेशीर आहे.

चणा डाळीचा आपण नेहमीच आहारामध्ये समावेश करू शकतो. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी चणा डाळ खूप फायदेशीर आहे. चणा डाळ वजन कमी करण्यासही मदत करते.

राजमा जास्त करून पंजाबमध्ये खाल्ला जातो. हे चवदार असण्यासोबतच शरीरासाठीही फायदेशीर आहे. मात्र, नेहमीच दुपारच्या जेवनामध्ये राजम्याचा समावेश करा. शक्यतो रात्री राजमा खाणे टाळा.