
क्रिती सेननने घातलेला हा पिवळ्या रंगाचा जंपसूट उन्हाळ्यात घालण्यासाठी उत्तम आहे. असा जंपसूट तुम्ही घातला आणि त्यावर केस रिकामे सोडले तर तुम्ही सुंदर दिसू शकता. तसंच उन्हाळ्यात कंफर्टेबलही राहाल.

या फोटोमध्ये क्रिती सॅननने हिरव्या रंगाची शिफॉन साडी घातली आहे. ही शिफॉन साडी उन्हाळ्यासाठी उत्तम पर्याय आहे. चांगल्या लूकसाठी क्रितीसारखे कानातलेही तुम्ही घालू शकता.

मल्टी कलर रॅप ड्रेस क्रिती सारखाच तुमचंही सौंदर्य खुलवू शकतो. हा मल्टी कलर रॅप ड्रेस उन्हाळ्यासाठी योग्य आहे. तुम्ही पार्टीसाठी हा लुक फॉलो करू शकता.

क्रिती सॅनन निऑन ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. क्रितीने हा ड्रेस डेनिम जॅकेटसोबत स्टाइल केला आहे. हा ड्रेस स्टायलिश आणि स्पोर्टी असा लुक देणारा ड्रेस तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच हवा.

क्रितीचा ब्लश पिंक मिनी बॉडीकॉन ड्रेस तुमच्या समर पार्टी वेअर कलेक्शनमध्ये असायलाच हवा. कमीत कमी अॅक्सेसरीज आणि सॉफ्ट-ग्लॅम मेकअप आवडणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे.