
पावसाळा असो किंवा हिवाळा त्वचेची काळजी घेणे महत्वाचे आहे. हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडण्याची सामान्य समस्या आहे. कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी अनेकजण बाजारामधून उत्पादने खरेदी करतात. मात्र, म्हणावा तसा फरक पडत नाही. मात्र, कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करू शकता.

आपल्या सर्वांनाच माहीती आहे की, कोरफड आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी आपण कोरफड वापरू शकता. यासाठी कोरफडच्या गरामध्ये दोन चमचे लिंबाचा रस मिक्स करा आणि चेहऱ्याला लावा. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होते.

दररोज सकाळी अंघोळीच्या अगोदर आपण दोन चमचे लिंबाचा रस आणि हळद मिक्स करून चेहऱ्याला लावली पाहिजे. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होते आणि त्वचा तजेलदार होते.

हिवाळ्याच्या हंगामात आपण त्वचेला तूप लावले पाहिजे. तुपामध्ये असलेल्या घटकांमुळे आपली त्वचा मऊ आणि तजेलदार राहण्यास मदत होते. मात्र, शक्यतो रात्री झोपतानाच त्वचेला तूप लावले पाहिजे. यामुळे त्वचेवर धूळ बसणार नाही.