
वडा पाव... कुणाला आवडत नाही... सगळेच वडापावचे फॅन आहेत. संध्याकाळची छोटी भूक असो, की जिभेचे चोचले पुरवणं असो... यात वडापावचा नंबर पहिला लागतो. वडापाव मिर्ची आणि जोडीला चहा असेल तर मजा आ गया...

भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांनाही वडापाव खूप आवडतो. पुण्यातील प्रभात रेस्टॉरंटचे वडे गडकरींना खूप आवडतात. या वडापावची रेसिपी गडकरींनी एका मुलाखती दरम्यान सांगितली.

सगळ्यात आधी बटाटा उकडून घ्या. तो कुस्करा... त्यात लिंबू टाका. काळं मीठ टाका. आलं आणि लसणाची पेस्ट टाका. कांद्याचीही पेस्ट टाका. मिक्सरमध्ये ओबड धोबड वाटलेली मिर्ची टाका. थोडीशी साखरही टाका या सगळ्या गोष्टी एकत्र करा.

नंतर बेसन पीठात बुडवून हे वडे तळून घ्या. लाल मिर्ची पावडर किंवा हळदही या वडापावमध्ये नसते. पण अप्रतिम लागतो, असं गडकरींनी एका मुलाखती दरम्यान सांगितलं.

नितीन गडकरी हे खवय्ये आहेत. त्यांना वेगवेगळे पदार्थ खायला प्रचंड आवडतं. भारतीय पदार्थांसोबतच गडकरींना चायनीज खायलाही आवडतं. वडापाव, पोहे, डोसा हे पदार्थ गडकरी आवडीने खातात.