
सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. त्यासाठी वेगवेगळ्या क्रिम वापरतो. मात्र, खरोखरच सुंदर आणि तजेलदार त्वचा हवी असेल तर आपण कडुलिंबाच्या पानांचा वापर करून सुंदर त्वचा मिळू शकतो.

कडुलिंबाची पाने आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असतात. कडुलिंबाच्या सात ते आठ पानांची पेस्ट तयार करा आणि त्यामध्ये मध मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट आपल्या चेहऱ्याला लावा. दहा मिनिटांनी आपला चेहरा थंड पाण्याने धुवा.

12 कडुलिंबाची पाने घ्या आणि पेस्ट तयार करा. जर आपल्या त्वचेवर मुरुमांचा त्रास असेल तर त्यात मध आणि चिमूटभर दालचिनी घाला. हा पॅक आपल्या चेहऱ्यावर वीस मिनिटे ठेवा आणि त्यानंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुवा.

कडुलिंबाची पाने, 2 चमचे गुलाब पाणी, 2 चमचे मुलतानी माती घ्या. त्यानंतर याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. दहा मिनिटांनी आपला चेहरा थंड पाण्याने धुवा.

कडुलिंबाच्या पानांची बारीक पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट पिंपल्स आलेल्या जागी लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.