
पालक - ही पालकची रेसिपी खाण्यासाठी खूप पाैष्टीक आहे. हे तेलात जिरे, लसूण, आले, लवंगा, हिरव्या मिरच्या आणि लाल तिखट टाकून तयार केली जाते. आपण दररोजच्या आहारामध्ये याचा समावेश करू शकता.

पालक टिक्की - पालक खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आपण घरच्या-घरी पालक टिक्की देखील तयार करू शकता. हे कॉर्न, बटाटा आणि पालकापासून बनवले जाते.

पालक मटर कबाब - तुम्ही पालकातून एक उत्तम कबाब स्नॅक रेसिपी देखील बनवू शकता. ही रेसिपी बनवण्यासाठी पालक, मटार, बटाटे, पनीर आणि मसाले वापरतात.

पालक ढोकळा - या स्नॅकमध्ये कॅलरी कमी आणि पोषक तत्व जास्त प्रमाणात असतात. हे पालक, दही आणि बेसन वापरून बनवले जाते.

लक चाट - हे बनवण्यासाठी बेसन, पालकाची पाने आणि दही वापरले जाते. कुरकुरीत होण्यासाठी तळले जाते. नंतर त्यात मसालेदार दही आणि चटणी घालून शेव आणि डाळिंब घालून सर्व्ह केले जाते.