
गंगूबाई काठियावाडी चित्रपटातील बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची भूमिका आणि लूक जोरदार चर्चेत आहे. आलिया भट्टच्या चाहत्यांना तिचा हा चित्रपट खूप आवडला आहे.

या चित्रपटातील आलिया भट्टच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. अलीकडेच आलियाने मुंबईत आयोजित 21व्या ITA पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.

आलियाने सुंदर सिल्व्हर रंगाची साडी आणि स्लीव्हलेस ब्लाउज घातला होता. यामध्ये अलियाचा लूक एकदम जबरदस्त दिसत होता. आलियाचा हा लूक चांगलाच व्हायरल होत आहे.

या लुकसह आलियाने इको-फ्रेंडली फॅशन स्टेटमेंट केले. ही साडी Bloony Atelier वेबसाइटवर उपलब्ध आहे. स्टर्लिंग साडी असे त्याचे नाव आहे. या साडीची किंमत 25,060 रुपये आहे.

काहींना आलियाचा हा लूक खूप आवडला आहे, तर काहीजण तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत.