

खसखस मॉईश्चरायझर म्हणून वापरु शकता. त्यासाठी तुम्ही खसखसच्या बिया दुधात बारीक करून घ्या. ही पेस्ट चेहर्यावर लावा आणि 10 मिनिटांनी चेहरा धुवा.

खसखसमध्ये जीवनसत्त्व ई असते. हे केस गळण्याची समस्या कमी करण्यास मदत करते. यासाठी आपण खसखस पाण्यात भिजवून डोक्यावर लावू शकता.

कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही खसखस वापरु शकता. यासाठी तुम्ही नारळाच्या तेलात खसखस मिसळून टाळूवर लावू शकता.

केसांची वाढ होण्यासाठी खसखस वापर करता येतो. यासाठी आपण खसखस, कांद्याची पेस्ट आणि नारळाच्या दुधाची पेस्ट बनवून डोक्यावर लावू शकता. अर्ध्या तासाने केसांवर लावून ठेवा आणि केस धुवा.