
सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण घरगुती उपाय नेहमी केले पाहिजेत. त्वचेच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी घरगुती फेसपॅक मदत करतात. आपल्या त्वचेसाठी तांदळाचे पाणी खूप फायदेशीर आहे. तांदळाच्या पाण्याच्या मदतीने आपण काही फेसपॅक तयार करू शकता.

तांदळाचे पाणी आणि बेसन- शिजणाऱ्या भातामधून तांदळाचे पाणी चार चमचे काढा. त्यानंतर ते थोडे थंड होई द्या. त्यानंतर या पाण्यामध्ये बेसन पीठ मिक्स करा आणि चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा.

तांदळाचे पाणी आणि गुलाबजल- दोन चमचे तांदळाचे पाणी घ्या आणि त्यामध्ये गुलाबजल मिक्स करा. हे पाणी आपल्या चेहऱ्यावर लावा. यामुळे आपल्या चेहऱ्यावर फेशियलसारखा ग्लो येईल.

तांदळाचे पाणी आणि कोरफड- चार चमचे तांदळाचे पाणी, दोन चमचे मुलतानी माती आणि दोन चमचे कोरफडचा गर घ्या. हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा. यामुळे आपली त्वचा सुंदर होते.