
हिवाळ्यात कोरडेपणाची समस्या सामान्य आहे. त्याचबरोबर प्रदूषणाच्या परिणामामुळे त्वचेवर कोरडेपणा तर वाढतोच, पण त्वचा निस्तेजही होऊ लागते. त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय फाॅलो केले पाहिजेत.

कच्च्या दूधाच्या मदतीने चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर करण्यास मदत होते. कच्च्या दुधामध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड, विविध जीवनसत्त्वे आणि प्रथिने त्वचेला एक्सफोलिएट करतात आणि हायड्रेट ठेवतात.

काकडीमुळे तुमचा चेहरा चमकदार होतो. यामुळे चेहऱ्यावर ताजेपणा येतो आणि घाण दूर होते. काकडीचा रस दह्यात मिसळून लावल्याने त्वचा चमकदार होते आणि आतून ओलावा येतो.

मध त्वचेमधील ओलावा वाढवण्याचे काम करतो. रोज अर्धा चमचा मध थोड्या पाण्यात मिसळून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याला ओलावा येतो. तसेच हिवाळ्याच्या हंगामातही आपली त्वचा तजेलदार दिसण्यास मदत होते.