
मळमळने : अनेकांना विविध कारणांमुळे मळमळ होत असते. परंतु हा त्रास जर नियमित होत असेल तर या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांच्या मते पोटात गाठ निर्माण झाल्यामुळे तुम्हाला मळमळीचा त्रास होऊ शकतो. ही गाठ पुढे चालून कॅन्सरचे कारण होऊ शकते.

थकवा येणे : थकवा येणे हे देखील पोटाच्या कॅन्सरचे एक लक्षण आहे. अनेक लोक थकव्या सारख्या समस्येला गांभीर्याने घेत नाहीत. मात्र दीर्घकाळ थकव्याची समस्या राहिल्यास ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक मानले जाते.

पोटदुखी : ट्यूमरच्या वाढीमुळे अनेकदा पोटात दुखते. सततची पोटदुखी हे देखील एक कर्करोगाचे मुख्य लक्षण आहे. तुम्हाला जर सतत पोटदुखीचा त्रास होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

भूक न लागणे : पोटात दुखण्याव्यतिरिक्त जर तुम्हाला नियमित भूक लागत नसेल किंवा कमी भूक लागत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. भूक न लागणे हे देखील पोटाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. अशा स्थितीमध्ये या समस्येकडे दुर्लक्ष करणे तुमच्या जीवावर बेतू शकते. भूक न लागल्याने तुमचे वजन देखील झपाट्याने कमी होते.

बद्धकोष्ठता