
गरोदरपणात शरीरात होणारे बदल आपल्या सर्वांना माहीत आहेत. हे सर्व हार्मोन्सच्या चढउतारामुळे घडते. यादरम्यान त्वचा आणि केसांशी संबंधित अनेक समस्या समोर येतात. झपाट्याने केस गळणे हा देखील याचाच एक भाग आहे. मात्र, ही केस गळती कमी करण्यासाठी आपण काही घरगुती टिप्स फाॅलो केल्या पाहिजेत.

आवळा केस आणि त्वचेसाठी खूप चांगला मानला जातो. तुम्ही रोज आवळ्याचा रस घेऊ शकता किंवा सकाळी रिकाम्या पोटी आवळा जाम खाऊ शकता. यामुळे केस गळतीची समस्या दूर होण्यास मदत होईल.

दही केसांसाठी कंडिशनर म्हणून काम करते, तसेच त्यांना मजबूत बनवते. तुम्ही दही थेट केसांना लावू शकता. सुमारे 15 मिनिटे ठेवा. त्यानंतर डोके धुवा. यामुळे केस गळती कमी होते.

अंड्यांमध्ये असलेले प्रोटीन केसांसाठी खूप फायदेशीर असते. हे केस गळणे थांबवते आणि केस मजबूत बनवते. अंड्याचा पांढरा भाग काढून त्यात दोन चमचे ऑलिव्ह ऑईल मिसळा आणि केसांना हलक्या हातांनी मसाज करा.