
सुंदर त्वचा मिळवण्यासाठी नेहमी घरगुती उपाय केले पाहिजेत. सध्याचा हिवाळ्याच्या हंगामामध्ये तर कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय करा. विशेष: फळांचे फेसपॅक आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असतात.

पपईचा लगदा चार चमचे घ्या आणि त्यामध्ये दूध मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर साधारण वीस मिनिटे ठेवा. यामुळे पिंपल्स आणि कोरड्या त्वचेची समस्या दूर होईल.

अर्धा चमचा मध, अंड्यातील पिवळा बलक मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यासह मानेला लावा. दहा मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा.

अर्धा चमचा मध, अंड्याचा पांढरा भाग, एक चमचा दही मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर समान प्रमाणात लावा. साधारण अर्धा तास ही पेस्ट चेहऱ्यावर राहूद्या. (टीप: या बातमीतील मजकूर प्राथमिक माहितीवर आधारित आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या)