
चहाची वेळ ठरलेली नसते. आपण हवा तेव्हा चहा पितो. चहाचे अनेक प्रकार आहेत. जे चवीसोबतच आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. मात्र, दुधाचा चहा जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरात विषबाधा होऊ शकते. ज्यामुळे वारंवार छातीत जळजळ होण्याची शक्यता वाढते. दुधाच्या चहापेक्षा हर्बल टी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

तुम्ही कॅमोमाइल चहाबद्दल अनेकदा ऐकले असेल. या औषधी वनस्पतीला लहान पांढरी फुले येतात. कॅमोमाइल चहाचे हजारो फायदे आहेत, चिंता कमी करण्यापासून ते झोपेपर्यंत. यामुळे आपण दररोज कॅमोमाइल चहाचे सेवन केले पाहिजे.

ग्रीन टी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी अत्यंत फायदेशीर आहे. आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये ग्रीन टी चा समावेश केला पाहिजे.

तुळशीचा चहा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुळशीचा चहा विशेषतः नैराश्य आणि चिंताग्रस्त लोकांसाठी फायदेशीर आहे. तुळशीच्या पानांचे छोटे तुकडे करून, पाण्यात उकळून, गाळून, दालचिनी पावडर आणि मध मिक्स करा आणि प्या.