

रोज रात्री झोपताना नाभीला मोहरीचे तेल लावावे. यामुळे फाटलेल्या ओठांची समस्याही दूर होते. नाभी हे आपल्या शरीराचे केंद्र मानले जाते. रोज असे केल्याने ओठ मऊ आणि गुलाबी होतात.

रात्री झोपताना चिमूटभर हळद क्रिममध्ये मिसळून लावल्यानंतरही ओठ फाटण्याची समस्या दूर होते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही फक्त क्रीम किंवा तूप घेऊन हलक्या हातांनी ओठांना मसाज करू शकता.

हिवाळ्यात व्हॅसलीन प्रत्येक घरात असते. रोज रात्री झोपताना ओठांवर व्हॅसलीन लावल्याने फुटलेले ओठ बरे होतात. यासोबतच काळेपणाही निघून जातो.