
सुंदर त्वचेसाठी तुम्ही अनेक घरगुती उपाय करून पाहू शकता. अतिनील किरण, मुरुम, डाग आणि टॅनिंग टाळण्यासाठी अनेक नैसर्गिक उपाय हे नेहमी केले पाहिजेत. या घरगुती उपायांनी तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होईल.

चेहरा चमकदार बनवण्यासाठी आपण दोन चमचे हळदीमध्ये गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्याला लावले पाहिजे. ज्यामुळे आपला चेहरा चमकदार आणि सुंदर होण्यास मदत होते.

तीन चमचे कोरफडचा गर घ्या. त्यामध्ये दोन चमचे साखर मिक्स करा आणि ही पेस्ट आपल्या चेहऱ्यासह मानेवर लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर राहूद्या. कोमट पाण्याने चेहरा धुवा.

एक चमचा चंदन पावडर घ्या आणि त्यात अर्धा चमचा मध, अर्धा चमचा दही मिसळा. तिन्ही घटक व्यवस्थित मिसळा आणि फेसपॅक प्रमाणे आपल्या चेहऱ्यावर लावा. साधारण वीस मिनिटानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

मध, लिंबू आणि चंदन पावडरचा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला मध 2 चमचे, चंदन पावडर 3 चमचे, 2 चमचे लिंबाचा रस आणि गुलाब पाणी लागणार आहे. हे सर्व साहित्य मिक्स करा आणि चेहऱ्याला लावा. दहा मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.