हात दाखवला तर कोणी मिठी मारायला धावलं… अंबानींच्या वनतारातील प्राण्यांनी कसं केलं मेस्सीचं स्वागत

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने जामनगरमधील 'वनतारा' प्रकल्पाला भेट दिली. अनंत अंबानींच्या या उपक्रमाचे कौतुक करतानाच मेस्सीने तिथे महाआरतीही केली. या भेटीचे खास फोटो आणि सविस्तर माहिती वाचा.

| Updated on: Dec 17, 2025 | 3:25 PM
1 / 12
मैदानावर प्रतिस्पर्धी खेळाडूंना चकवणारा अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी हा सध्या भारत दौऱ्यावर आहे. सध्या तो एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. मेस्सीने नुकतंच गुजरातच्या जामनगर येथील वनतारा (Vantara) या जगातील सर्वात मोठ्या वन्यजीव पुनर्वसन केंद्राला भेट दिली.

2 / 12
अनंत अंबानी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रकल्पातील आधुनिक सोयीसुविधा आणि प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून मेस्सी अक्षरशः भारावून गेला. त्याचे यावेळीचे काही फोटो समोर आले आहेत.

3 / 12
लिओनेल मेस्सीसोबत इंटर मियामीचे त्याचे सहकारी लुईस सुआरेझ आणि रोड्रिगो डी पॉल हे देखील उपस्थित होते. जामनगर विमानतळावर उतरल्यापासून त्यांचे भारतीय पद्धतीने स्वागत करण्यात आले.

4 / 12
वनतारा परिसरात पोहोचताच मेस्सीने तिथल्या मंदिरात त्यांनी महाआरतीही केली. यावेळी मेस्सीला उपरणे घालून, कपाळावर टिळा लावून त्याचे स्वागत करण्यात आले. त्याचा हा लूक चाहत्यांसाठी फारच सुखद ठरला.

5 / 12
मेस्सीने संपूर्ण वनतारातही फेरफटका मारला. यावेळी काही क्षण कॅमेऱ्यात कैद झाले, जे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यावेळी त्याने वाचवलेले वाघ, सिंह, हत्ती, जिराफ, सरपटणारे प्राणी आणि जगभरातून आणलेले प्राणी त्याने पाहिले.

6 / 12
याशिवाय हरित ऊर्जा संकुल आणि जगातील सर्वांत मोठ्या रिफायनरी संकुलालाही भेट दिली. तसेच मेस्सीने वनतारा येथील मल्टी-स्पेशालिटी वाइल्डलाइफ हॉस्पिटललाही भेट दिली. हे रुग्णालय प्राण्यांसाठी जगातील सर्वात प्रगत मानले जाते.

7 / 12
यावेळी सिंह, बिबट्या, वाघ आणि इतर प्राण्यांच्या संगोपन केंद्रात मेस्सीने या प्राण्यांबद्दल आस्थापूर्वक चौकशी केली. त्यानंतर त्यांनी हर्बिव्होर केअर सेंटर आणि रेप्टाइल केअर सेंटरला भेट दिली.

8 / 12
तिथे प्रत्यक्ष सुरू असलेली एक शस्त्रक्रिया पाहताना मेस्सीने वैज्ञानिकांशी आणि डॉक्टरांशी संवाद साधला.  वन्यजीव संवर्धनासाठी भारताने घेतलेली ही झेप पाहून त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचे आणि अनंत अंबानींच्या समर्पणाचे कौतुक केले.

9 / 12
या भेटीची आठवण म्हणून अनंत आणि राधिका अंबानी यांनी वनतारा येथील एका नवजात सिंहाच्या छाव्याचे नाव लिओनेल असे ठेवले आहे.  मेस्सीसाठी हा एक मोठा सन्मान होता.

10 / 12
यावेळी त्याने आपल्या भावना व्यक्त केल्यात. वनतारा जे काही करत आहे, ते केवळ कौतुकास्पद नसून पृथ्वीसाठी अत्यंत सुंदर कार्य आहे, असे मेस्सीने म्हटले.

11 / 12
लिओनेल मेस्सी त्याच्या विशेष 'GOAT' (Greatest of All Time) टूर निमित्त भारतात आला होता. या दौऱ्यात त्याने कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली या शहरांना भेटी दिल्या. जामनगरच्या वनतारा भेटीने त्याने या दौऱ्याचा समारोप केला.

12 / 12
सर्व फोटो - इन्स्टाग्राम/ सोशल मीडिया

सर्व फोटो - इन्स्टाग्राम/ सोशल मीडिया