PHOTO | लेपझिगवर 2-0 ने मात, लिव्हरपूलची उपांत्यपूर्व फेरीत धडक

लेपझिगला (leipzig) 2-0 ने पराभूत करत लिव्हरपूलने (Liverpool) यूएफा चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व (UEFA Champions League) सामन्यात धडक मारली आहे.

Sanjay patil | Updated on: Mar 11, 2021 | 9:27 PM
1 / 4
लिव्हरपूलने लेपझिगला 2-0  ने पराभूत करुन यूएफा चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.  यापूर्वी लिओनेल मेस्सीच्या बार्सिलोना आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या युवेंट्सचं आव्हान संपुष्टात आले आहे.

2 / 4

एका वृत्तसंस्थेनुसार, लिव्हरपूलने सामन्यादरम्यान गोल करण्याची संधी गमावली. पण दुसऱ्या हाफमध्ये काही मिनिटांमध्ये 2 गोल लगावले. यासह लिव्हरपूलने विजय प्राप्त केला. उभयसंघ पहिल्या हाफमध्ये गोल करण्यात अपयशी ठरले.

3 / 4

यानंतर दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांनी गोल करण्याचा प्रयत्न केला. लिव्हरपूलकडून मोहम्मद सालेहने 70 व्या मिनिटाला गोल केला. यानंतर 74 व्या मिनिटाला लिव्हरपूलकडून सादिओ मानेने एक गोल केला. यामुळे 2-0 ने आघाडी घेतली. यासह त्याने संघाला 2-0 ने आघाडी मिळवून दिली.

4 / 4

निर्धारित वेळेत लेपझिगकडून कोणालाही एक गोल करता आला नाही. त्यामुळे लिव्हरपूलचा दणदणीत विजय झाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us