
घरात पाल दिसली की अनेकजण आरडाओरड करण्यास सुरुवात करतात. अनेकदा उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात घराच्या भिंतीवर पाल दिसते. तिला पाहताच आपल्यापैकी अनेकांना किळस येते.

पण पाल घरात दिसणे शुभ असते की अशुभ असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत.

वास्तुशास्त्रानुसार पाल अंगावर पडणे हे शुभ आणि अशुभ दोन्हीचे संकेत असते. स्त्रीच्या डाव्या अंगावर आणि पुरुषाच्या उजव्या अंगावर पाल पडणे शुभ मानले जाते.

जर तुम्ही नवीन घरात गेलात किंवा गृहप्रवेश करताना जर तुम्हाला पाल दिसली तर ते पूर्वजांचे आगमन झालं, असं मानलं जातं. पालीच्या रुपाने पूर्वज तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येतात असंही म्हटलं जातं.

पण जर नवीन घरात प्रवेश करताना मृत पाल दिसली ते अशुभ लक्षण मानले जाते. यामुळे घर मालकाला अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते.

शास्त्रानुसार पाल हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. घराच्या मंदिरात पाल दिसणे शुभ चिन्ह मानले जाते. ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारते आणि घरात सुख-समृद्धी येते.

जर तुम्हाला जमिनीवर किंवा भिंतीवर सरपटत चालणारी पाल दिसत असेल तर ते चांगलं मानलं जातं.

जर तुम्ही स्वप्नात पाल पकडण्याचा प्रयत्न करत असाल आणि पाल घाबरून पळत असेल, तर ते शुभ चिन्ह मानले जाते. याचा अर्थ लवकरच चांगली बातमी मिळेल. तुम्हाला धनलाभ होईल, असे संकेत असतात.

जर घरात दोन पाली आपापसात भांडत करताना दिसल्या तर ते अशुभ लक्षण मानले जाते. यामुळे कुटुंबात भांडणं होऊ शकते. तसेच नातेवाईक किंवा मित्रांशी मतभेद होण्याची शक्यता असते.

घरात काळी पाल दिसणे अशुभ मानले जाते. विशेषत: देव्हाऱ्यावर किंवा देव्हाऱ्याजवळ काळी पाल दिसल्यास आर्थिक संकट किंवा इतर अडचणी येऊ शकतात असे मानले जाते.

जर कधी पाल मुख्य दरवाजातून घरात प्रवेश करताना दिसली तर ते शुभ चिन्ह मानले जाते. अशावेळी घरावर लवकरच पैशांचा पाऊस पडेल असे मानले जाते.
