
थायलंडमधील कायांग क्राचन राष्ट्रीय उद्यानात एक अतिशय दुर्मिळ आणि अनोख्या प्रजातीचा खेकडा आढळला आहे. हा खेकडा जांभळ्या रंगाचा असून तो रात्रीच्या अंधारात चमकत आहे. (photo credit- Department of National Parks, Wildlife and Plant Conservation, Thailand)

या खेकड्याच्या चमकण्याच्या गुणधर्मामुळे सगळे चकित झाले आहेत. सोशल मीडियावर या खेकड्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. हा सोध म्हणजे निसर्गाची अनोखी भेटच असल्याचे या उद्यानाच्या प्रशासनाने सांगितले आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

जांभळ्या रंगाच्या चमकणाऱ्या खेकड्याच्या या प्रजातीला किंग क्रॅब म्हटले जात आहे. हा खेकडा सापडणे म्हणजे कायांग क्राचन राष्ट्रीय उद्यानात जैवविधात मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचे हे द्योतक असल्याचे या उद्यान प्रशासनाने म्हटले आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

किंग क्रॅब या खेकड्याला सिंरिंधोर्न क्रॅब असेही म्हटले जाते. थायलंडची राजकुमारी महा चक्री सिरिधोर्न हिच्या नावावरून या खेकड्याचे नाव नाव ठेवण्यात आलेले आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

दरम्यान, आता या खेकड्याच्या अनोख्या प्रजातीवर संशोधन केले जाणार आहे. हा खेकडा अत्यंत दुर्मिळ असल्याचे बोलले जात आहे. सध्या या खेकड्याचे फोटो शोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)