
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात वर्षातील दुसरे चंद्रग्रहण होणार आहे. हे ग्रहण कोणत्या राशीत होईल आणि त्याचा प्रभाव नक्कीच काही राशींवर पडणार आहे. जाणून घेऊयात दुसऱ्या चंद्रग्रहणाशी संबंधित खास गोष्टी. हे चंद्रग्रहण भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी होईल. पितृपक्ष देखील या दिवसापासून सुरू होणार आहे

वर्षातील दुसरे चंद्रग्रहण कुंभ राशीत होईल. हे ग्रहण भारतात दिसणार आहे. दुसरे चंद्रग्रहण 7 सप्टेंबर रोजी होईल. हे ग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री 9.58 वाजता सुरू होईल आणि पहाटे 1.26 वाजता संपेल.

वर्षातील दुसऱ्या चंद्रग्रहणाचा परिणाम तसा सर्व राशींवरच होणार आहे. परंतु ज्या राशींना सर्वात जास्त काळजी घ्यावी लागणार आहे अशा 3 राशी आहेत.त्या कोणत्या जाणून घेऊयात.

कर्क: या राशीच्या लोकांनी या काळात त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कुटुंबासोबत वेळ घालवा आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. वादविवाद आणि आळस यापासून स्वतःला दूर ठेवा.

कुंभ रास: हे ग्रहण कुंभ राशीत होणार आहे. या राशीच्या लोकांना जास्त काळजी घ्यावी लागेल. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, कोणत्याही प्रकारे निष्काळजी राहू नका. तुमच्या नात्यांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात, तुमचे नाते समजून घेण्याचा आणि ते टिकवण्याचा प्रयत्न करा.

मीन रास : मीन राशीच्या लोकांना वर्षातील दुसऱ्या चंद्रग्रहणापासून सावधगिरी बाळगावी लागेल. हे ग्रहण तुमच्या समस्या वाढवू शकते. ते तुम्हाला मानसिकदृष्ट्या त्रास देऊ शकते आणि तुमच्या समस्या वाढू शकतात. तुमचे खर्च नियंत्रणात ठेवा.

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही )