Mallika Sherawat Dahi Handi : मल्लिका शेरावतला पाहण्यासाठी तुफान गर्दी, दहीहंडीच्या कार्यक्रमात अवतरलं ग्लॅमर, पाहा फोटो
Magathane Dahi Handi : मागाठाणे येथील दहीहंडी उत्सवात अभिनेत्री मल्लिका शेरावतची खास उपस्थिती पाहायला मिळाली. तिच्या सिनेमांमधील लोकप्रिय गाणी वाजताच मल्लिकाने मंचावर डान्स करत उपस्थितांचं मनोरंजन केलं.
1 / 5

मागाठाणेमध्ये यंदाही दहीहंडीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. याठिकाणी तारामती चॅरिटेबल फाउंडेशनकडून दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे.
2 / 5
दरम्यान यावेळी मल्लिका शेरावतला पाहण्यासाठी तुफान गर्दी झाली होती. यावेळी तिच्या सिनेमांमधील विविध लोकप्रिय गाणी प्ले करण्यात आली.
3 / 5
या गाण्यांवर मल्लिकाने दहीहंडी पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांसाठी गोविंदांच्या चाहत्यांसाठी नृत्यही केले.
4 / 5
मल्लिका शेरावतने एक काळ गाजवला आहे. तिचे आणि बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी यांचे सिनेमे सिनेप्रेमींनी डोक्यावर घेतले होते.
5 / 5
दरम्यान, यावेळी मल्लिकाने -मंचावरुन सर्वांशी मजेदार संवाद साधला. ती म्हणाली की, "तुम्ही सगळे मला ओटीटीवर पाहताय ना, स्टेटस, रील पाहून मजा येतेय ना, आय लव्ह यू सो मच. माझ्यासाठी तुम्हीच सगळे सेलिब्रेटी आहात."
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us