महाराष्ट्रात आणखी एका विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा पेटला, थेट ‘जटायू’चे नाव देण्याची मागणी
महाराष्ट्रात आणखी एका विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा पेटला आहे. नाशिकच्या विमानतळाचं नामकरण करण्याची मागणी केली जात आहे.

नवी मुंबईनंतर नाशिकमधील ओझर विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या विमानतळाला 'जटायू' असे नाव देण्याची मागणी करण्यात येत आहे. रामायणात जटायूचे मोठे योगदान आहे, त्यामुळे महंताकडून मागणी केली जात आहे.
महंत भक्ती चरणदास महाराज हे शासनाकडे प्रस्ताव पाठवणार आहे . रामायण सीतेला वाचवण्यासाठी उड्डाण केल्याचा उल्लेख आहे.
नाशिक ही श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झाल्याचा दावा महंताकडून केला जातो. त्यात नाशिक विमानतळाचे अद्याप नामकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे ही मागणी केली जात आहे.
आगामी सिंहस्ताच्या पार्श्वभूमीवर जटायू विमानतळ नाव योग्य असल्याची भावना महंत व्यक्त करत आहेत. आता शासन स्तरावर काय निर्णय होतो याकडे लक्ष लागलं आहे.
दुसरीकडे नाशिक विमानतळाला कर्मवारी दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्याची मागणी देखील केली जात आहे. आता रामायणातील जटायूचे नाव देण्याची मागणी पुन्हा एकदा समोर आली आहे. त्यामुळे नामकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.