
साप म्हटलं की अगोदर पळापळ सुरू होते. जो तो सुरक्षित ठिकाणी धाव घेतो. विषारी सापाने दंश केला तर काही मिनिटात त्या मनुष्याचा, प्राण्याचा मृत्यू अटळ असतो. पण महाराष्ट्रात असे एक गाव आहे जिथे पाळीव प्राण्यांप्रमाणे सापांना वागवले जाते.

या गावात साप लोकांच्या अंगाखांद्यावर असतात. ते घरात दिसतात. अंगणात असतात. जणू माणूसच सापाच्या वस्तीत राहायला आलाय असे वाटते. विषारी कोब्रापासून ते अनेक जातीचे साप या गावात आहेत.

महाराष्ट्रातील शेतफळ नावाचे गावा आहे. येथील लोक सापांना घरातील, कुटुंबातील सदस्य समजतात. तो त्यांचा खास मित्र असतो. ते सापांना मुळीच घाबरत नाहीत. विषारी कोब्रा सुद्धा प्रत्येक घरात दिसतो.

ही लोकं सापाला मित्र आणि शंकराचे प्रतिक मानतात. गावात सापाला दूध, पाणी पाजण्यात येते. मुलं या सापांसोबत खेळतात.

शेतफळ गावात सापांची पूजा केली जाते. येथे सापांची पूजा करण्यासाठी खास मंदिर पण आहे. त्यात सापांची प्रतिकृती कोरण्यात आलेली आहे.

या गावातील छतावर, स्वयंपाक घरात, झाडांवर, शेतात सहज साप आढळून येतात. या गावातील लोक सापाला मित्र मानतात. त्यांना घाबरत नाही. विषारी सापामुळे कुणाचाही अद्याप मृत्यू झाला नसल्याचा गावकऱ्यांचा दावा आहे.