‘सिंघम’ पोलीस लाथ मारुन घरात शिरला, औरंगाबादेत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला वाचवलं

संबंधित महिला घरगुती वादाच्या कारणावरुन राहत्या घरी आत्महत्येचा प्रयत्न करत होती. या घटनेची माहिती मिळताच औरंगाबादमधील दक्ष पोलिसांनी तिच्या घरी धाव घेतली आणि तिचे प्राण वाचवले

| Edited By: | Updated on: Aug 18, 2021 | 2:11 PM
1 / 5
औरंगाबादमध्ये पोलिसाच्या तत्परतेमुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे प्राण वाचवण्यात यश आले. घराचा दरवाजा तोडून पोलिसाने आत्महत्येचा प्रयत्न करत असलेल्या महिलेला थांबवले.

2 / 5
औरंगाबाद शहरातील सिडको चिखल ठाण्यात घडलेला हा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

3 / 5
संबंधित महिला घरगुती वादाच्या कारणावरुन राहत्या घरी आत्महत्येचा प्रयत्न करत होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिच्या घरी धाव घेतली.

4 / 5
 पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला घराचा दरवाजा उघडण्याची विनंती केली, मात्र आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा सिंघम पोलिस अधिकाऱ्याने लाथ मारुन घराचा दरवाजा उघडला.

5 / 5
पोलीस अधिकारी घरात शिरले, त्यावेळी महिला गळफास घेऊन आयुष्य संपवण्याच्या तयारीत होती. मात्र पोलिसांनी तिला आत्महत्या करण्यापासून रोखत वेळीच तिचे प्राण वाचवले.