Rain Updates : 20, 21, 22, 23, 24, 25 ऑक्टोबरला महाराष्ट्रात पाऊस परतणार, पंजाबराव डख यांचा महत्त्वाचा अंदाज समोर!
शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगाम गेला आहे. उभे पीक जळून गेले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे लक्ष रबी हंगामाकडे लागलेले आहे. एक किंवा दोन वेळा पाऊस पडला तर रबी हंगाम हाती लागू शकतो, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

सध्या राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. या ऑक्टोबर महिन्यात मुंबई, पुणे शहरासह इतरही जिल्ह्यांत तापमान वाढले आहे. आगोदरच दुष्काळ आणि त्यात या तापमानवढीमुळे सर्वांचेच हाल सुरू आहेत.
शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगाम गेला आहे. उभे पीक जळून गेले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे लक्ष रबी हंगामाकडे लागलेले आहे. एक किंवा दोन वेळा पाऊस पडला तर रबी हंगाम हाती लागू शकतो, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
दरम्यान, हवामानाची माहिती देणाऱ्या पंजाबराव डख यांनी पावसाबाबत महत्त्वाचा अंदाज व्यक्त केलाय. राज्यात सध्या 17 ऑक्टोबरपर्यंत पावसाची स्थिती नाही. परंत दसरा झाल्यानंतर राज्यात पाऊस येईल, असं त्यांनी सांगितलंय.
येत्या 20 ते 25 ऑक्टोबरच्या काळात परतीचा पाऊस येईल. याच परतीच्या पावसामुळे रबी हंगामातील पेरण्या होतील. ज्वारीचे पीक या पावसावर येऊ शकते, असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.
तसेच, हा पाऊस मात्र राज्यात सर्व ठिकाणी होणार नाही. राज्यात पाऊस काही ठिकाणी होईल. तर काही ठिकाणी रिमझीम पाऊस होईल. 18 ऑक्टोबरनंतर वातावरणात बदल होईल.