
आपण एखादी गोष्ट करतो, ती आपल्यासाठी नगण्य असू शकते. पण प्रत्येक कृतीमागे मोठा अर्थ दडलेला असतो. तुम्ही जे करता, त्याचे महत्व जाणलं पाहिजे.

मौन राखणं हे काही सोप काम नाही. मौन हे अतिशय शक्तीशाली भाषणं असतं. तुमच्या मौनाची दखल हळूहळू जगही घेईल.

तुम्ही किती सामर्थ्यवान आहात, हे फक्त तुमच्या शारीरिक शक्तीवरून दिसत नाही. तर एखादी गोष्ट करण्याची तुमची इच्छाशक्ती किती दुर्दम्य आहे, यातूनही ते दिसतं.

माणूस जो विचार करतो , तेच तो आचरणात आणतो. त्यामुळे नेहमी चांगला विचार करावा, तसे वागावे.

सोनं, चांदी, पैसे ही सगळी भौतिक, वरवरची संपत्ती आहे. आपलं चांगलं आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. आरोग्य चांगलं असेल तर सर्वकाही मिळवता येतं.