
लालबागच्या राजाची सुरुवात साल 1934 मध्ये झाली असली तरी लालबागच्या गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीत बदल होत आला आहे.यंदाच्या लालबागच्या राजाची मूर्ती मरुन कलरचे पितांबर नेसलेली आहे.

लालबागच्या मूर्तीची निर्मिती साल 1934 पासून होत असली तरी आठ दशकात राजाच्या मूर्तीची निर्मिती मूर्तीकार कांबळी कुटुंब करीत आले आहे.

लालबागच्या गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीमध्ये पूर्वी दरवर्षी बदल होत होते. कधी कृष्ण, कधी श्री राम तर कधी विष्णू अशा रुपात लालबागचा राजा दिसत आले आहेत.

लालबागच्या राजाच्या मूर्तीमध्ये तत्कालीन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचे चित्र दिसून येत आहे. एक मूर्ती बालगंधर्व यांच्या रुपातील दिसत आहेत.

लालबागच्या राजाच्या गणेश मूर्ती शेजारी महात्मा गांधी बसलेले दिसत आहेत. ही साल 1942 मधील मूर्ती असून गवालिया टॅंक मैदान येथील सभेत गांधीजीनी इंग्रजांना चले जावचा इशारा दिला होता.