
चहापानाला शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित होते, त्यात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दीपक केसरकर, पाणीपुरवठा मंत्री गुलबराव पटील अशा अनेक बड्या नेत्यांचा समावेश होता.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेही चहापानाला दिसून आले, यावेळी त्यांच्याबरोबर मंत्री धनंजय मुंडेही दिसून आले, त्याचबरोबर इतर राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्रीही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

काँग्रेसकडूनही अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात अशा नेत्यांची चहापानाला उपस्थिती दिसून आली. या चहापानाला तिन्ही पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती होती.

पावसाळी अधिवेशनासारखेच हे हिवाळी अधिवेशनही वादळी ठरण्याची शक्यता आहे, कारण या अधिवेशनात विविध मुद्यांवरून भाजप महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करताना दिसून येणार आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही महाविकास आघाडीतील नेत्यांशी संवाद साधताना दिसून आले.

भाजप सोडले तर इतर पक्षातील नेतेही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

अजित पवार आणि बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, अशोक चव्हाण यावेळी एका फ्रेममध्ये दिसून आले.

या अधिवेशनात आरक्षणाच्या मुद्द्यांबरोबरच, पेपरफुटी आणि पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स, दारूवरील टॅक्स यावरूनही घमासान होण्याची शक्यता आहे.