
नेटफ्लिक्सवर 'फॅबुलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स' हा पॉप्युलर शो आहे. लोकांना या शोमध्ये बॉलिवूड स्टार्सच्या पत्नीच्या आयुष्यात काय चाललय? हे जाणून घेण्यात इंटरेस्ट आहे.

शो चे आतापर्यंत तीन सीजन आले असून प्रेक्षकांना हा शो आवडला आहे. शो मध्ये अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूर सुद्धा आहे. तिने या मध्ये आपलं लग्जरी लाइफ दाखवलं आहे.

शो मध्ये महीपने आपल्या पर्सनल लाइफबद्दल सुद्धा प्रेक्षकांना सांगितलं. एका मुलाखतीत तिने पती संजय कपूरसोबतच्या पहिल्या भेटीचा उल्लेख केला.

नशेमध्ये असताना संजय कपूरसोबत पहिली भेट झाल्याच महीपने सांगितलं. त्याचवेळी ती संजय कपूरचे आई-वडिल, भाऊ-वहिनी यांना भेटली होती.

"आमची लव्ह स्टोरी खूप सामान्य आहे. मी त्यावेळी एका व्यक्तीसोबत वन नाइट स्टँड केलेला. मी त्यावेळी हा विचार केला नव्हता की, मी त्याच्यासोबत लग्न करणार आहे" असं महीप कपूरने सांगितलं.