
झी मराठी वाहिनीवरील 'पारू' या मालिकेत अनुष्काच्या एन्ट्रीनंतर सगळी गणितं बदलताना दिसत आहेत. अनुष्काच्या वागण्याने अहिल्यादेवी प्रभावित झाल्या आहेत. आदित्यमध्येही बदल दिसायला लागला आहे.

आदित्यला अनुष्काचा सहवास आवडायला लागला आहे. आदित्य पहिल्यांदा पोलो नेक शर्ट घालून अनुष्कासोबत डिनरसाठी बाहेर पडतो.

अनुष्कामुळे आदित्यमध्ये झालेला हा बदल अहिल्याला चांगला वाटतोय. म्हणून अहिल्यादेवी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

यासाठी ती अनुष्काकडे आदित्यशी नातं पुढे वाढवायला आवडेल का हा प्रश्न करते. आदित्यच्या वाढदिवशी अनुष्का आदित्यला सर्वांच्या उपस्थितीत पार्टीत प्रपोज करायचं ठरवते.

त्यानंतर पारू आदित्यपासून दूर राहू लागली आहे. आदित्यलादेखील पारूच्या वागण्यात बदल जाणवतोय. आता अनुष्काच्या प्रपोजलमुळे पारू-आदित्यच्या नात्यात दुरावा येईल का, हे मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल.