उकडीचे मोदक कसे बनवाल? ‘या’ 7 स्टेप्समध्ये बनवा बाप्पाचा आवडता नैवेद्य

बाप्पाचा (गणपतीचा) आवडता नैवेद्य म्हणजे मोदक. खासकरून उकडीचे मोदक बाप्पाला खूप आवडतात. आता गणपती लवकरच भक्तांच्या घरी येणार आहे. त्यामुळे बाप्पाच्या आवडीचा पदार्थ मोदक सर्वांच्या घरी बनेल. तर जाणून घ्या मोदक बनवण्यासाठी सोपी पद्धत...

| Updated on: Aug 05, 2025 | 2:00 PM
1 / 7
साहित्य तयार करा: तांदळाचं पीठ (सारणासाठी), खिसलेलं ओलं खोबरं, गूळ, तूप, वेलदोडा पूड, पाणी घ्या

2 / 7
 सारण तयार करा: एका कढईत तूप गरम करून त्यात गूळ आणि ओलं खोबरं घाला. हे दोन्ही मध्यम आचेवर शिजवून घ्या. गूळ पूर्णपणे विरघळल्यानंतर वेलदोडा पूड घालून मिश्रण गार होण्यासाठी ठेवा.

3 / 7
उकड तयार करा: एका पातेल्यात पाणी गरम करा, त्यात चिमूटभर मीठ व थोडंसं तूप घाला. पाणी उकळल्यानंतर त्यात तांदळाचं पीठ टाका व झाकण ठेवून काही मिनिटे ठेवून द्या.

4 / 7
पीठ मळून घ्या: थोडं गार झाल्यावर, पीठ हाताने किंवा पाण्याने ओलसर करून चांगलं मळून घ्या. पीठ मऊसर व एकजीव झालं पाहिजे.

5 / 7
गोळे बनवा: तयार पिठाचे छोटे गोळे करा व त्याचे छोटे पुड्यासारखे खोलगट आकार द्या.

6 / 7
सारण भरून मोदकाचा आकार द्या: प्रत्येक पुड्यामध्ये सारण भरून त्याला हलक्या हाताने करंजीसारखा किंवा फुलासारखा मोदकाचा आकार द्या.

7 / 7
मोदक वाफवून घ्या: एका मोदक भांड्यात किंवा इडलीच्या भांड्यात मोदक ठेवून १०-१५ मिनिटे वाफवून घ्या. झाकण लावून मध्यम आचेवर वाफवा. अशा प्रकारे मोदक तयार करा