Malaika-Arjun: प्रेम होतं, पण या एका गोष्टीवरून मलायका-अर्जुनचं बिनसलं; समोर आलं खरं कारण
Malaika Arora: अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचं ब्रेकअप नेमकं कोणत्या कारणामुळे झालं, याबद्दलची माहिती समोर आली आहे. हे दोघं जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट करत होते.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचं नातं बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या रिलेशनशिपपैकी एक होतं. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2024 मध्ये दोघांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली. त्यानंतर या नात्याच्या तुटण्यामागचं नेमकं कारण काय, याबाबत सातत्याने चर्चा होत होती. आता एका पॉडकास्टमध्ये मनोरंजन पत्रकार विकी लालवानी यांनी केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा या चर्चेला उधाण आलं आहे.
विकी लालवानी यांनी 'हिंदी रश'सोबतच्या पॉडकास्टमधील चर्चेत दावा केला की, अर्जुन आणि मलायकाच्या नात्यात प्रेम होतं; मात्र दोघांच्या लग्नाबाबतच्या अपेक्षा वेगळ्या होत्या. मलायकाला लग्न करायचं होतं, तर अर्जुन त्यासाठी तयार नसल्याचं त्यांनी सांगितलं.
विकी यांच्या दाव्यानुसार, मलायकाला त्या काळात लग्न करायचं होतं आणि अर्जुनकडून कदाचित लग्नासाठी आणखी वेळ मागितला जात होता. मात्र नात्यातील एका व्यक्तीला लग्न करायचं असेल आणि दुसऱ्याला नसेल, तर अशा परिस्थितीत नातं पुढे नेणं कठीण होऊ शकतं, असं त्यांनी म्हटलं आहे.
विशेष म्हणजे, या नात्याबद्दल बोलताना विकी लालवानी यांनी अर्जुन आणि मलायका यांच्यात खरंच प्रेम होतं, असा दावा केला. त्यांच्या मते हे केवळ काही काळाचं आकर्षण किंवा फ्लिंग नव्हतं. दोघांनी अनेक वर्षे एकमेकांना साथ दिली आणि त्यांचं नातं गंभीर होतं. अर्जुनच्या मनात आजही मलायकाबद्दल प्रेम असण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
अर्जुन आणि मलायका यांनी 2018-19 च्या आसपास डेटिंगला सुरुवात केली होती. त्यानंतर दोघे अनेकदा सार्वजनिक ठिकाणी, पार्ट्या, डिनर आणि सुट्ट्यांमध्ये एकत्र दिसले. सोशल मीडियावरही त्यांचे फोटो चर्चेत असायचे. जवळपास पाच ते सहा वर्षे हे नातं टिकले. अखेर 2024 मध्ये दोघांच्या ब्रेकअपचं वृत्त समोर आलं.