पट्टाभिषेकदरम्यान ममता कुलकर्णी भावूक; संन्यास घेताना डोळ्यातून वाहू लागले अश्रू

अभिनेत्री ममता कुलकर्णी किन्नर अखाड्याची महामंडलेश्वर बनली आहे. महाकुंभमध्ये तिचा पट्टाभिषेक करण्यात आला. यावेळी ममता भावूक झाल्याचं पहायला मिळालं. पट्टाभिषेक होत असताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते.

| Updated on: Jan 26, 2025 | 8:56 AM
1 / 7
नव्वदच्या दशकातील बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी आता किन्नर अखाड्याची महामंडलेश्वर बनली आहे. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमध्ये शुक्रवारी 24 जानेवारी रोजी तिने संन्यास घेतला.

2 / 7
संन्यास घेण्यापूर्वी ममताने स्वत:चं पिंडदान केलं आणि त्यानंतर तिचा पट्टाभिषेक पार पडला. पट्टाभिषेक प्रक्रियेदरम्यान ममता कुलकर्णी भावूक झाल्याचं पहायला मिळालं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते.

3 / 7
ही संपूर्ण प्रक्रिया किन्नर अखाड्यामध्ये पार पडली. पिंडदान केल्यानंतर पुन्हा एकदा स्नान करावं लागतं आणि त्यानंतर शुद्धीकरण केलं जातं. शुद्धीकरणानंतर गुरूंकडून विभूती, कपडे आणि कंठी माळा दिली जाते.

4 / 7
यानंतर ईष्ट देवाची पूजा होते आणि मग दंड-कमंडल दिलं जातं. या संपूर्ण प्रक्रियेला पंचकर्म म्हटलं जातं. किन्नर अखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या उपस्थितीत ममताचा पट्टाभिषेक पार पडला.

5 / 7
बॉलिवूडचा एक काळ गाजवल्यानंतर ममता अचानक इंडस्ट्रीपासून दूर गेली. त्यानंतर ती अध्यात्माकडे वळल्याचं समजतंय. गेल्या काही वर्षांपासून ती परदेशात राहत होती. 25 वर्षांनंतर ती भारतात परतली.

6 / 7
संन्यास घेण्याच्या निर्णयाविषयी ममता म्हणाली, "हा महादेव आणि महाकाली यांचा आदेश होता. माझ्या गुरूंनी मला हा दिलेला आदेश होता. त्यांनीच आजचा दिवस निवडला. यात मी काहीच केलं नाही."

7 / 7
किन्नर अखाड्याची महामंडलेश्वर बनल्यानंतर ममताला श्री यमाई ममता नंदगिरी असं नाव देण्यात आलं.