
सर्पदंशामुळे मृत्यू झाला तर हिंदू धर्मानुसार त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात नाहीत. विशेष म्हणजे तो मृतदेह पुरलाही जात नाही. अशा मृतदेहांवर नेमकं काय केलं जातं हे जाणून घेऊ या...

भारतात सापाची पूजा केली जाते. सापाला हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे. सापाला भगवान महादेवाशी जोडले जाते. कारण महादेवाच्या गळ्यात नेहमी साप दिसतो.

जेव्हा एखाद्या व्यक्तीचा सर्पदंशाने मृत्यू झाला तर भारताच्या काही भागात संबंधित व्यक्ती पूर्णपणे मेलेली नाही, असे समजले जाते. वेळेवर उपचार केले तर त्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो, असे काही लोकांची धारणा असते.

त्यामुळेच अशा लोकांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात नाहीत. तसेच त्या व्यक्तीला जमिनीत दफनही केले जात नाही. भारताच्या काही भागात सर्पदंशाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह नदीत सोडून दिला जातो.

अगोदर काही लोक औषधी वनस्पतींच्या मदतीने सापाच्या विषाचा प्रभाव नष्ट करायचे आणि सर्पदंश झालेल्या व्यक्तीचा जीव वाचायचा. अशा प्रकारचे लोक नदीच्या कनाऱ्यावर राहायचे. सर्पदंशाने मृत्यू झालेल्या एखाद्या व्यक्तीचा मृतदेह वाहून आला तर नदीकिनारी असणारे हे लोक त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करायचे.

त्यामुळे अगोदर सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जात नव्हते. हीच प्रथा अजूनही काही लोक पाळतात. त्यामुळेच सर्पदंश झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात नाहीत.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.