वडिलांच्या निधनाने पूर्णपणे खचली प्रियांका चोप्राची बहीण; अंत्यविधीला रडली ढसाढसा

अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 16 जून रोजी प्रियांकाचे काका आणि अभिनेत्री मन्नारा चोप्राचे वडील रमन राय हांडा यांचं निधन झालं. 18 जून रोजी त्यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मन्नारा पूर्णपणे खचली होती.

| Updated on: Jun 19, 2025 | 8:44 AM
1 / 5
मन्नारा चोप्राचे वडील रमन राय हांडा यांचं वयाच्या 72 व्या वर्षी निधन झालं. गेल्या काही काळापासून जे आजारी होते. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वडिलांना अखेरचा निरोप देताना मन्नाराला अश्रू अनावर झाले होते. तिच्या चेहऱ्यावरील दु:ख स्पष्ट पहायला मिळत होतं.

2 / 5
अंत्यविधीला मन्नारा चोप्रा, बहीण मिताली आणि चुलत भाऊ सिद्धार्थ चोप्रासुद्धा उपस्थित होते. यावेळी मन्नारा ढसाढसा रडत होती. वडिलांना मुखाग्नी दिल्यानंतर ती स्वत:ला सावरू शकली नाही. अखेर बहीण मितालीने तिला समजावण्याचा प्रयत्न केला.

3 / 5
दोघी बहिणी एकमेकींना मिठी मारून रडू लागल्या होत्या. हे संपूर्ण दृश्य अत्यंत भावनिक होतं. मुसळधार पावसात मन्नाराच्या वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. वडिलांच्या निधनानंतर मन्नाराने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली होती.

4 / 5
‘अत्यंत दु:खाने आणि वेदनेनं आम्ही आमच्या प्रिय वडिलांच्या निधनाची माहिती देत आहोत. ते 16 जून 2025 रोजी आम्हाला सोडून गेले. ते आमच्या कुटुंबासाठी शक्तीचा आधारस्तंभ होते’, अशा शब्दांत मन्नाराने दु:ख व्यक्त केलं होतं.

5 / 5
मन्नारा ही अभिनेत्री प्रियांका आणि परिणिती चोप्रा यांची चुलत बहीण आहे. रमन राय यांच्या अंत्यविधीला परिणिती चोप्राचे वडीव पवन चोप्रादेखील उपस्थित होते. परदेशात असलेल्या प्रियांकानेही काकांच्या निधनानंतर सोशल मीडियावर पोस्ट लिहित शोक व्यक्त केला होता.