
मराठा आरक्षण आंदोलनाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आपल्या समर्थकांसह मुंबईत धडकले आहेत. मुंबईत आझाद मैदान परिसरात सर्व वातावरण भगवमय झालं आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर सगळ्या महाराष्ट्रातून मराठा आंदोलक मुंबईत आले आहेत. आज ठिकठिकाणी मुंबईच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी दिसून आली.

मराठा आंदोलक आता CSMT स्थानकात पोहोचले आहेत. रेल्वे स्थानक परिसरात अनेक मराठा कार्यकर्ते तिथेच झोपले आहेत. रेल्वे स्थानक परिसरात या मराठा आंदोलकांची घोषणाबाजी सुरु आहे.

पाटील-पाटील म्हणून मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी सुरु आहे. त्यामुळे CSMT स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय होत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना शांततेच आवाहन केलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भगवं वादळ मुंबईत धडकलं आहे. त्याचवेळी पाऊसही सुरु आहे. पावसामुळे अनेक मराठा आंदोलकांचे हाल होत आहेत. काहींनी गाडीतच जेवणं बनवलं.