
मनोज जरांगे पाटील आज स्टेजवरच कोसळले. त्यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. त्यांची प्रकृती खूपच खालावलीय. शरीरात ताकत नाहीय.

मनोज जरांगे पाटील स्टेजवरच कोसळले. त्यावेळी त्यांना तिथे असलेल्या दोघांनी सावरलं. उपोषणाचा गंभीर परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झालाय.

ग्रामस्थ मनोज जरांगे पाटील यांना पाणी पिण्याच आवाहन करत होते. 'पाणी घ्या, पाणी घ्या, जरांगे पाटील पाणी घ्या' अशी घोषणाबाजी गावकऱ्यांकडून सुरु होती.

"तुमची माया मला कळतेय. मी पाणी प्यायलो तर लेकराला कस न्याय मिळेल. मी या समाजाला माय-बाप मानतो हे खरं आहे" असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

"समाजाच तुम्हाला ऐकावच लागेल. आज तुम्हाला पाणी प्यावच लागेल असा आवाज समोर असलेल्या गर्दीतून आला"