
बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन यांची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अनेक हिट चित्रपटे त्यांनी बॉलिवूडला दिली आहेत.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक चढउतार हे बघितले आहेत. एककाळ असा होता की, अमिताभ बच्चन यांचे एका मागून एक चित्रपट फ्लॉप जात होते.

हेच नाहीतर सतत चित्रपट फ्लॉप जात असल्याने अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत काम करण्यासही नकार दिला. जंजीर चित्रपटाची ऑफर अनेक अभिनेत्रींना करण्यात आली. परंतू अमिताभ बच्चन यांच्यामुळे अभिनेत्रींनी नकार दिला.

शेवटी जंजीर चित्रपटाला आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यास अभिनेत्री जया भादुरी बच्चन यांनी होकार दिला. चित्रपटाने मोठा धमाका केला आणि हा चित्रपट सुपरहिट ठरलाय.

अमिताभ बच्चन यांनी असे ठरवले होते की, जर जंजीर हा चित्रपट फ्लॉप गेला तर मुंबई सोडून ते थेट इलाहाबादला रवाना होणार होते. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी मागे वळून बघितले नाही.