
लसून कच्चे किंवा शिजवून कोणत्याही पद्धतीने खाऊ शकतात. परंतु साजूक तुपात शिजवून लसणाचे सेवन केल्यावर अनेक आजारांवर रामबाण उपाय ठरणार आहे. त्यामुळे तुमची पाचन क्षमता सुधारते. पोटातील समस्या दूर होतात.

लसणामध्ये असलेले सल्फर संयुगे आणि तुपात आढळणारे ओमेगा-३ फॅटी ऍसिड हृदयासाठी चांगले असतात. त्यामुळे तुमचे ह्रदय निरोगी राहील. रक्तदाब नियंत्रित राहील. तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.

लसणामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म आहेत. तसेच साचूक तूप शरीराला इन्फेक्शनपासून वाचवतो. लसूण आणि तूप दोन्ही शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. त्यामुळे शरीराला रोगांशी लढण्याची ताकद मिळते.

सर्दी आणि खोकल्यापासून लसणामुळे आराम मिळतो. लसूण आणि तुपाच्या मिश्रणाने सर्दी, खोकला आणि घसादुखीपासून आराम मिळतो. यामुळे शरीराला उष्णता मिळते आणि कफ बाहेर पडण्यास मदत होते.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर लसूण खाणे फायदेशीर आहे. लसूण आणि तूप एकत्र खाल्ल्याने त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते. केसांची चमक वाढते आणि केस निरोगी होतात.