PHOTO | पुस्तक रुपात नवी ‘आतिषबाजी’, मधुरा वेलणकरला राज्यपालांच्या हस्ते ‘कोव्हिड योद्धा’ पुरस्कार!

| Updated on: Nov 03, 2020 | 3:26 PM

सोशल मीडियावर तयार झालेला हा ‘एकमेव’ ‘अद्वितीय’ दिवाळी ग्रंथ आहे.

1 / 5
लॉकडाऊनच्या काळात मनोरंजनक्षेत्र पूर्णतः बंद असताना नवोदित लेखक, कवी मंडळींना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम हिने सुरू केलेल्या "मधुरव" या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला. लिखाणाचा वसा पुर्णत्वास नेण्यासाठी याच सर्व लिखाणाची, प्रकाशनाची जबाबदारी घेत अभिनेत्री मधुरा वेलणकरने “आतिषबाजी” हा दिवाळी अंक पुस्तक स्वरूपात प्रकाशित केला आहे.

2 / 5
ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम, प्रदीप वेलणकर, रजनी वेलणकर, अभिनेता सुबोध भावे, सुमित राघवन, अभिनेत्री मुक्ता बर्वे, डॉ. समीरा गुजर, राजू परुळेकर, मुग्धा गोडबोले यांच्या उपस्थितीत हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.

3 / 5
सोशल मीडियावर तयार झालेला हा ‘एकमेव’ ‘अद्वितीय’ दिवाळी ग्रंथ आहे.

सोशल मीडियावर तयार झालेला हा ‘एकमेव’ ‘अद्वितीय’ दिवाळी ग्रंथ आहे.

4 / 5
लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियाचा उत्तम वापर करून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाची दखल थेट महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतली असून, "कोविड योद्धा" म्हणून अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम हिला नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.

5 / 5
महाराष्ट्र सरकारने आमच्या या उपक्रमाची दखल घेऊन "कोविड योद्धा" म्हणून मला सन्मानित केले यासाठी मी त्यांची मनापासून आभारी आहे, असे मधुरा यावेळी म्हणाली.