प्राजक्ता माळीने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा

मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. अशातच आता तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

| Updated on: Jun 12, 2026 | 1:04 PM
1 / 5
लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी आता आपल्या कारकिर्दीतील एका नव्या पर्वाला सुरुवात करत आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारी प्राजक्ता आता दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी आता आपल्या कारकिर्दीतील एका नव्या पर्वाला सुरुवात करत आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारी प्राजक्ता आता दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

2 / 5

मराठी मालिकांपासून ते चित्रपटांपर्यंत अनेक गाजलेल्या भूमिका साकारत प्राजक्ताने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवले आहे. तिच्या सहजसुंदर अभिनयशैलीमुळे आणि विविधांगी व्यक्तिमत्त्वामुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली आहे.

3 / 5

आता मराठी मनोरंजन क्षेत्रात यशस्वी वाटचाल केल्यानंतर ती तेलुगू चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवण्यासाठी सज्ज झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्राजक्ताच्या आगामी तेलुगू चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू असून हा चित्रपट याच वर्षात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

4 / 5

या नव्या प्रोजेक्टबाबत बोलताना प्राजक्ताने सांगितले की, चित्रपटाची कथा, कलाकारांची नावे तसेच तिच्या भूमिकेबाबतची अधिकृत माहिती लवकरच समोर येईल. त्यामुळे या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे.

5 / 5

प्राजक्ता या चित्रपटात कोणत्या भूमिकेत दिसणार, तिचा लूक कसा असेल आणि ती कोणत्या दाक्षिणात्य कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करणार याबाबत सध्या विविध चर्चांना उधाण आले आहे. मराठी मनोरंजन विश्वातील तिच्या यशस्वी कारकिर्दीनंतर आता दक्षिणेतील या नव्या प्रवासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us