‘पुढचे 15 दिवस…’, प्राजक्ता माळीची नवीन पोस्ट, चाहत्यांना धक्का, पोस्ट वाचून..

ना चित्रपट, ना शूटिंग, तरी देखील पुढचे 15 दिवस प्राजक्ता माळी सोशल मीडिया पासून राहणार दूर. नेमकं काय कारण?

| Updated on: Feb 28, 2026 | 12:30 PM
1 / 5
सौंदर्य क्वीन मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी कारण एखादा चित्रपट, कार्यक्रम किंवा फोटोशूट नसून ती एका वेगळ्या  निर्णयामुळे चर्चेत आली आहे.

2 / 5
प्राजक्ताने स्वतः सोशल मीडियावर माहिती देत पुढील 15 दिवस ती 'नॉट रिचेबल' असणार असल्याचं सांगितलं आहे. प्राजक्ताने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर 'Bye Bye Phone for next 15 days' अशी पोस्ट शेअर केली आहे.

3 / 5
यासोबतच तिने स्टोरीवर एक फोटो आणि व्हिडीओही शेअर केला. तिची ही पोस्ट पाहताच चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि थोडीशी चिंता देखील निर्माण झाली. सोशल मीडियावर कायम सक्रिय असणारी प्राजक्ता अचानक 15 दिवस ऑफलाइन जाणार असल्याने अनेकांनी नेमकं काय झालं? असा प्रश्न विचारायला सुरुवात केली.

4 / 5
स्टोरीमध्ये शेअर केलेल्या व्हिडीओमुळे तिच्या या निर्णयामागचं कारण स्पष्ट झालं आहे. प्राजक्ता सध्या बंगळुरू येथे असलेल्या The Art of Living Foundation च्या आश्रमात गेली आहे. हा आश्रम आध्यात्मिक गुरू Sri Sri Ravi Shankar यांनी स्थापन केला आहे.

5 / 5
ध्यान, योग, प्राणायाम आणि मानसिक शांततेसाठी जगभरातून लोक येथे येतात. प्राजक्ता या ठिकाणी 15 दिवसांचा आर्ट ऑफ लिव्हिंग कोर्स करत असून या काळात ती मोबाईल आणि सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहणार आहे.

Follow Us