Priya Marathe Death: अवघ्या 38 व्या वर्षी प्रियाचा संपला आयुष्याचा प्रवास, तिच्याबद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?

Priya Marathe Death: अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनानंतर मराठी कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी अभिनेत्री अखेरचा श्वास घेतला. कर्करोगाशी झुंज लढत असाना प्रिया मराठे हिने रविवारी पहाटे चार वाजता अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर येत आहे.

| Updated on: Aug 31, 2025 | 11:36 AM
1 / 5
अभिनेत्री प्रिया मराठे हिने झगमगत्या विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. फक्त मराठी नाही तर, हिंदी मालिकांमध्ये देखील अभिनेत्रीने महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

2 / 5
‘या सुखांनो या’, ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’ या मराठी, तर ‘बडे अच्छे लगते हैं’, ‘पवित्र रिश्ता’, ‘कॉमेडी सर्कस’ या मालिका आणि शोमध्ये प्रियाने स्वतःचा ठसा उमटवला... आजही तिने साकारलेल्या भूमिका चाहत्यांच्या लक्षात आहेत.

3 / 5
प्रिया फक्त अभिनेत्रीच नव्हती तर उद्योजिका देखील होती. अभिनेत्रीने  स्वतःचा कॅफे देखील सुरु केला होता. कॅफेचे फोटो देखील प्रियाने सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

4 / 5
मालिका, सिनेमातच नव्हे तर, प्रिया नाटकांमध्ये देखील सक्रिय होती. ‘अ परफेक्ट मर्डर’, ‘तिला काही सांगायचंय’ या नाटकांमध्ये तिने मुख्य भूमिका साकारल्या होत्या. अभिनेत्रीच्या निधनामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

5 / 5
गेल्या 1 वर्षांपासून प्रिया सोशल मीडिया आणि रुपेरी पडद्यापासून दूर होती. प्रकृती स्थिर नसल्यामुळे तिने ‘तुझेच मी गीत गाते’ मालिकेतून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. आता अभिनेत्रीच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.