Rinku Rajguru: डार्लिंग… अखेर रिंकू राजगुरूने दिली प्रेमाची कबुली, कोण आहे तो?

सध्या सगळीकडे मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरुची चर्चा रंगली आहे. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाची कबूली दिली आहे.

| Updated on: Mar 28, 2026 | 3:23 PM
1 / 7
अभिनेत्री रिंकू राजगुरू ही कायमच चर्चेत असते. प्रेक्षकांच्या मनात 'आर्ची' म्हणून घर करून बसलेल्या आर्चीविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर असतात. नुकताच तिने आपल्या खासगी आयुष्यातील प्रेमाची गोड कबुली दिली आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरू ही कायमच चर्चेत असते. प्रेक्षकांच्या मनात 'आर्ची' म्हणून घर करून बसलेल्या आर्चीविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर असतात. नुकताच तिने आपल्या खासगी आयुष्यातील प्रेमाची गोड कबुली दिली आहे.

2 / 7

काही दिवसांपूर्वी रिंकूने आपल्या आयुष्यात कुणीतरी विशेष व्यक्ती असल्याचे सांगितले होते. आता तिने इन्स्टाग्रामवर एक अतिशय गोड आणि रोमँटिक स्टोरी शेअर केली आहे.

3 / 7

या स्टोरीची सुरुवातच "डार्लिंग, तुझ्या प्रेमात वेडी झालीये!" अशा ओळीने झाली आहे. रिंकूने या पोस्टला 'आय एम सो इन लव्ह विथ यू' हे रोमँटिक इंग्रजी गाणे जोडले आहे. गाण्यात "मी तुझ्या प्रेमात पडले आहे, तुझ्यासाठी वेडी झाले आहे, तुझ्यावरून क्षणभरही नजर हटवू शकत नाही" अशा ओळी आहेत.

4 / 7

चाहत्यांना आता उत्सुकता लागली होती की ही पोस्ट नेमकी कुणासाठी आहे? तर रिंकूने याच स्टोरीमध्ये उत्तरही दिले आहे.

5 / 7

रिंकूने पोस्टमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे - रोमिओ... ❤️ पण इथे रोमिओ म्हणजे शेक्सपियरच्या ज्युलिएटचा रोमिओ नव्हे, तर रिंकूचा लाडका पेट डॉग 'रोमिओ'!

6 / 7

या स्टोरीमध्ये रिंकूने एक गोड फोटोही शेअर केला आहे. त्यात मागे एक छोटा टेडी बेअर दिसतो आहे आणि त्याच्या मागे एक छोटा पपी (रोमिओ) बसलेला दिसत आहे. रोमिओच्या नावासोबत तिने हार्ट इमोजी आणि डॉगचे फुटप्रिंट्सही टाकले आहेत.

7 / 7

रिंकूने आपल्या या लाडक्या कुत्र्याला 'डार्लिंग' म्हणून संबोधून प्रेम व्यक्त केल्याने सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us