साधेपणातलं सौंदर्य भारीच! रिंकू राजगुरुच्या साडीत दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
'सैराट' सिनेमात आर्चीची भूमिका साकारत एका रात्रीत प्रसिद्धीझोतात आलेली, अभिनेत्री रिंकू राजगुरू आता मराठी अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहे. रिंकूच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आता देखील रिंकूचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री तिच्या मराठमोळ्या लूकमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र रिंकू हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.
रिंकू राजगुरू कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता देखील अभिनेत्रीने खास फोटो पोस्ट केले आहेत. साध्या लूकमध्ये अभिनेत्री सुंदर दिसत आहे. रिंकूचा हा सिंपल लूक तुम्ही देखील फॉलो करु शकता...
अभिनेत्रीने खास फोटोशूट केलं आहे. सध्या सोशल मीडियावर रिंकू हिचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. चाहते अभिनेत्रीच्या लूकचं कौतुक देखील करत आहेत. पोस्टवर कमेंट करत चाहते म्हणतायेत साधेपणातलं सौंदर्य भारीच!
रिंकू हिच्याबद्दल सांगायचं झालं तर 'सैराट' सिनेमातून एका रात्रीत स्टार झाल्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील अभिनेत्रीने पदार्पण केलं आहे. चाहते कायम रिंकूच्या आगामी सिनेमांच्या प्रतिक्षेत असतात.
अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.