मराठमोळ्या गायिकेचं मुस्लीम पुरुषाशी लग्न, 5 वर्षात काय अनुभवलं? मोठं सत्य अखेर समोर
झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी मुस्लीम पुरुषाशी लग्न केलं, तर अनेक अभिनेत्यांनी मुस्लीम तरुणीसोबत लग्न केलं. आता मराठमोठ्या गायिकेने तिच्या वैवाहिक आयुष्याचा मोठा खुलासा केला आहे. तिने मुस्लीम पुरुषासोबत लग्न केलं आहे.

सध्या ज्या मराठमोळ्या गायिकेच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ती गायिका दुसरी तिसरी कोणी नाही तर, शाल्मली खोलगडे आहे. शाल्मली हिने 2021 मध्ये मुस्लीम बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं. आता गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर तिने लग्नाबद्दल सांगितलं आहे.
मुस्लीम पुरुषाची लग्न करणं तिच्यासाठी सोपं होतं का? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर शाल्मली म्हणाली, 'आम्ही दोघांनी खूप बाजूंनी विचार नाही. आम्ही फक्त दोन बाजूंनी विचार केला. एक माझी बाजू दुसरी त्याची बाजू... कारण लग्न आम्हाला करायचं होतं.'
'माझ्या आई - वडिलांना फक्त चांगला मुलगा हवा होता... त्यांच्यासाठी तेच महत्त्वाचं होतं. तुम्हाला बरं नसलं की तो माणूस तुमच्याशी कसा वागतो, तुमची प्रगती होते तेव्हा तो माणूस कसा असतो, तुम्ही जेव्हा खचलेले असता तेव्हा तो कसा असतो...'
पुढे शाल्मली म्हणाली, 'तुम्ही कसे एकमेकांची काळजी घेता किंवा एकमेकांना प्रोत्साहन देता हे त्यांनी पाच वर्षात बघितलं. त्याच्यात धर्म कुठेच येत नाही. मी त्याच्या धर्माच्या चार गोष्टी शिकते आणि तो माझ्या धर्माच्या...
गणेशोत्सवाबद्दल शाल्मली म्हणाली, 'तो स्वतः गणपती जास्त साजरा करतो. माझ्यापेक्षा तो त्याच्या सगळ्या मित्रांकडे दर्शनासाठी जातो आणि मी घरी बसलेली असते. मला वाटतं की सगळ्या धर्मांमध्ये काही ना काहीतरी आहे, जे आपण घेऊ शकतो..., असं देखील शाल्मली म्हणाली.